अस्वीकरण आणि परतावा धोरण (Disclaimer & Refund Policy)
या वेबसाईटवर आणि आमच्या ॲप्लिकेशनवर उपलब्ध करून दिलेली सर्व माहिती, सराव चाचण्या आणि अभ्यास साहित्य हे केवळ विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आणि स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी तयार करण्यात आले आहे.
हे स्पष्टपणे घोषित करण्यात येते की, AK Perfection Academy हा एक खाजगी शैक्षणिक उपक्रम आहे. ही वेबसाईट किंवा आमचे ॲप्लिकेशन कोणत्याही शासकीय संस्थेद्वारे (Government) चालविले जात नाही आणि आमचा कोणत्याही सरकारी विभागाशी थेट संबंध नाही. ही वेबसाईट केवळ विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन टायपिंग आणि परीक्षा सरावासाठी (Practice Purpose Only) विकसित करण्यात आली आहे. भरती प्रक्रियेच्या अधिकृत आणि अंतिम माहितीसाठी विद्यार्थ्यांनी नेहमी संबंधित शासनाच्या अधिकृत संकेतस्थळांनाच भेट द्यावी.
आमच्या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असलेल्या सर्व टेस्ट सिरीज, कोर्सेस किंवा कोणत्याही डिजिटल सेवांसाठी 'नो रिफंड पॉलिसी' (No Refund Policy) लागू आहे. एकदा कोणत्याही कोर्स किंवा टेस्ट सिरीजचे शुल्क (Fees) जमा केल्यानंतर, ते शुल्क कोणत्याही कारणास्तव परत (Refund) केले जाणार नाही किंवा इतर कोणत्याही कोर्ससाठी बदलून (Transfer) दिले जाणार नाही. खरेदी करण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी सर्व नियम आणि तपशील काळजीपूर्वक तपासून घ्यावेत.
या वेबसाईटवरील किंवा ॲपवरील माहितीचा वापर करून विद्यार्थ्यांनी स्वविवेकाने आपले निर्णय घ्यावेत. कोणत्याही तांत्रिक त्रुटीमुळे किंवा चुकीच्या समजामुळे होणाऱ्या वैयक्तिक नुकसानीस ही संस्था कायदेशीररित्या जबाबदार असणार नाही.